अतिवृष्टी थांबावी म्हणून वरूण देवतेची आराधना

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब तालुक्यांसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी होत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी ओढ्याकाठची शेतजमीन व पिके पाण्याखाली असून सर्वत्र पूर परिस्थिती आहे पुलावर व रस्त्यावर पाणी असल्याने आनेक गांवचा संपर्क तुटला आहे घरे, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत ही होणारी नुकसान थांबावी यासाठी संत ज्ञानेश्वर बालक आश्रम तांदुळवाडीरोड कळंब येथे महादेव महाराज अडसूळ यांनी यज्ञाचे आयोजन केले व यातून पावसाची देवता, वरूण देवतेस पूजा व मंत्रोच्चारात आवाहन केले.
याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ यांनी याविषयी माहिती. दिली. अतिवृष्टीमुळे सर्वत्र नुकसान होत असल्याने हे थांबवण्यासाठी पाऊस थांबावा अशी प्रार्थना आम्ही या यज्ञातून वरून देवतेस केली आहे असे सांगितले. याप्रसंगी महादेव महाराज अडसूळ, सरस्वती अडसूळ, उद्धव काळे, प्रभावती काळे, यांनी यज्ञ, पूजा, आरती केली. याप्रसंगी सुरेश टेकाळे, मकरंद पाटील, विठ्ठल माने, माधवसिंग राजपूत, महादेव खराटे, अशोक शिंपले, संदीप सूर्यवंशी, बाळासाहेब कुलकर्णी, पोपट साळवे, सरस्वती अडसूळ, महाविष्णू अडसूळ यांची उपस्थिती होती.