ताज्या घडामोडी

श्री संत गोरोबा काका चरित्र कथा नियोजनासंदर्भात बैठक संपन्न

धाराशिव : श्री संत गोरोबा काका यांची चरित्र कथा धाराशिव येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२४ दरम्यान हभप श्री दीपकजी खरात महाराज यांच्या सुश्राव्य व समधुर वाणीने संपन्न होणार आहे. त्या संदर्भात नियोजनाची बैठक धाराशिव येथे तांबरी विभागामध्ये श्रीकृष्ण देशमुख यांच्या घरी संपन्न झाली. यामध्ये श्री संत गोरोबा काका यांच्या चरित्र कथेच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम करण्यात आली. या चरित्र कथेच्या दरम्यान दिनांक ७ मार्च रोजी एक दिवशीय श्री संत गोरोबा काका संत साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय करण्यात आला. तसेच या श्री संत गोरोबा काका यांची चरित्र कथा नियोजनासंदर्भात वेगवेगळ्या समित्या करून त्या समितीमध्ये कामाची विभागणी करून देण्यात आली. ही धाराशिव येथील बैठक संपन्न झाल्यानंतर सर्व उपस्थित श्रीक्षेत्र तेर येथील श्री संत गोरोबा काका मंदिरामध्ये जाऊन गोरोबा काका समाधीचे दर्शन घेऊन हा सोहळ्याचे नियोजन, आयोजन व संचालन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावे असा आशीर्वाद श्री संत गोरोबा काकांचे दर्शन घेऊन घेण्यात आला. तसेच श्रीफळ वाढवून हा श्री संत गोरोबा काका चरित्र कथा संपन्न करण्याचा संकल्प करण्यात आला. या कथेचे प्रवक्ते आदरणीय हभप श्री दिपकजी महाराज खरात यांची भेट घेऊन आशिर्वाद घेण्यात आले.
या बैठकीला व श्रीक्षेत्र तेर येथील संकल्पाला प्रा. सोमनाथ लांडगे, श्यामराव दहिटणकर, हभप ईश्वर महाराज कुंभार, श्रीकृष्ण देशमुख, राजाभाऊ लोहार, राजाभाऊ जगताप, सुनिल उकंडे, सौ. कविता पुदाले उकंडे, सौ. रुपाली डुकरे, श्रीमती. अर्चनाताई डुकरे,
सौ. मिरा महाबोले, सौ. मंगल सुरवसे, सौ. शांता ठाकूर, सौ. माधुरी घोडके, श्रीमती ललिता दासकर, श्रीमती कोमल बेले या
श्री बाळ कृष्ण महिला भजनी मंडळ नळदुर्गचे उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.