ताज्या घडामोडी

मोदीच्या हमीला जनतेची विश्वासाची हमी..-आ.राणाजगजितसिह पाटील

कळंब/जयनारायण दरक

तीन राज्यातील भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची अतुलनीय विश्वासार्हता, लोकप्रियता गृहमंत्री अमितभाई शहा यांचे अचूक आणि मेहनती निवडणूक व्यवस्थापन, राष्ट्रीय अध्यक्ष नडाजीचे सर्वकालीन मैत्रीपूर्ण संकट व्यवस्थापन त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने यात मोठी भूमिका बजावली आहे.
तेलंगणातील भाजपाचे अभुतपुर्व यश हे भविष्यात संघटनेच्या विस्तारासाठी व आत्मविश्वासासाठी मोठा पाया ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजय म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या गरीब कल्याण आणि लोककल्याणकारी योजनेबाबत ‘मोदींच्या हमी वरील जनतेच्या विश्वासाची हमी’ आहे.
हा निकाल म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीए महाविजयाचे धोतक आहे. भारतीय जनता पक्षाच्या समर्पित कार्यकर्त्याची आणि सामान्य मतदाराचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.