ताज्या घडामोडी

चालत्या कंन्टेनरच्या टायरने पेट घेऊन लागलेल्या आगीत कपडे जळाल्याने लाखों रूपयाचे नुकसान

कळंब तालुक्यातील परतापूर ते दहीफळ रस्त्यावर कपडे घेऊन जाणाऱ्या चालत्या कंन्टनरच्या टायरने पेट घेऊन लागलेल्या आगीत गाडीला आग लागून कपडे जळाल्याने लाखों रूपयाचे नुकसान झाले.कळंब अग्नीशामक दलाची वेळेवर मदत मिळाल्याने मोठे नुकसान टळले .
याबाबत सवीस्तर माहीती अशी की , गिरनार लॉजीस्टीक कंपनीचा कंन्टेनर सोलापूर येथुन छत्रपती संभाजीनगर येथे लहान मुलांची कपडे व अंडर गारमेंन्टची होजीअरी कपडे घेऊन जानारा कंन्टेनर क्र.एम.एच.-१९ सी.वाय ६८९२ ला परतापूर ते दहीफळ रोडवर टायर फुटुन अचानक आग लागल्याची माहिती बाभळगाव येथील तुषार वाघमारे यांनी पोलिसांना दिली,गाडीत रेशीम कपडे असल्याचे समजल्याने त्यांनी नुकसान अधिक होणार नाही या साठी प्रयत्न केले.
शुक्रवारी रात्री दहा च्या सुमारास घडली . या घटनेची माहीती येरमाळा पोलीसांना मिळताच येरमाळा पोलीसांनी कळंब नगर पालीकेच्या अग्नीशामक विभागाला माहीती देऊन घटनास्थळ गाठले .अग्नीशामक दलाची गाडी येईपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या मदतीने गाडीतील कपड्याच्या गाठी बाहेर काढल्या दरम्यान अग्नीशामक पथक दाखल होताच गाडीसह लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने गाडीचे आणि गाडीतील कपड्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले.

गिरनार लॉजीस्टीक कंपनीच्या कंटेनर ट्रकवर (मस्सा खं.ता.कळंब) येथील अरुण विठ्ठल तिकोने (वय३५) हा चालक बाभळगाव येथील पाहुण्याकडे गाडी घेऊन मुक्कामी जात असताना सदरील प्रकार घडला.ट्रकला टायर फुटुन आग लागल्याची माहीती मिळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे उपपोनि. आवारे ,सहाय्यक फौजदार सि.एम.मुंढे, चालक पोहेको शाहीद शेख यांनी अग्निशामक विभागाला माहीती देवुन घटनास्थळी जावुन मनिष गोरे,तात्या भातलवंडे,वैभव काळे,वैभव गायकवाड,
समाधान वाघमारे,अतुल वाघमारे,गोकुळ शिंदे यांच्यासह परतापुर,बाभळगाव येथील वीस ते पंचवीस ग्रामस्थांच्या मदतीने घागरी,बादल्यातून पाणी आणुन आग विझवण्याचे प्रयत्न केल्याने आगाटोक्यात राहिल्याने अग्निशमन विभागाला आगीवर लवकर नियत्रंण मिळवता आले.
कंन्टेनरमध्ये नेमका किती रूपयाचा माल होता हे चालकाला माहीत नसल्याने नेमके नुकसान किती झाले याची तक्रार पोलीसात दाखल झालेली नाही.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.