ताज्या घडामोडी
भाजपा धाराशिव सोशल मिडीया सेलच्या तालुका मंडळ संयोजकपदी दत्ता बारकुल निवड

भारतीय जनता पार्टी, धाराशिव सोशल मिडीया सेल यांच्या नियुक्त्या या पत्रकान्वये जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य व जिल्हा संयोजक सचिन घोडके यांनी कळंब मंडळ कार्यकारिणी जाहीर केली आहे .
यामध्ये कळंब मंडळ मंडळ संयोजकपदी येरमाळा येथील दत्तात्रय बारकुल यांची निवड करण्यात आली असून सहसयोंजक डिकसळ येथील अभय गायकवाड तर सदस्यपदी नायगाव येथील विकास वाघ,परतापूर येथील गोविंद गायकवाड,इटकुर येथील बिभीषण कुंभार, कोथळा येथील श्रीकृष्ण शिंदे, शेळका धानोरा येथील रोहित शेळके यांच्या निवड करण्यात आली आहे.