येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने गावातील महिलासाठी मसाला उद्योग प्रशिक्षण संपन्न

येरमाळा येथील ग्रामपंचायतच्या वतीने गावातील महिलासाठी मसाला उद्योग प्रशिक्षण घेण्यात आले.या प्रशिक्षणासाठी चाळीस माहिला सहभागी झाल्या होत्या हे प्रशिक्षण सुरभी ट्रेनिंग सेंटर यांच्या मार्फत घेण्यात आले. ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील,बचत गटाच्या महिलांना,गृहिणींना घरगुती कामा सोबत लहान मोठे उद्योग करुन आर्थिक प्राप्ती व्हावी या हेतूने शासकीय उपक्रमातून विविध व्यवसायाची प्रशिकक्षने दिली जातात,मसाले उद्योगात मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण श्रीमती सोनवणे यांनी दिले.प्रशिक्षणानंतर शेवटी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.प्रमाणपत्र वाटप करताना मंदाकिनी आबासाहेब बारकुल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भारतीय स्टेट बँकेचे फील्ड ऑफिसर गणेश आगलावे उपसरपंच गणेश बारकुल ग्रामपंचायत माजी सरपंच सुजाता देशमुख,सदस्य विलास बारकुल,शंकर कांबळे,वनमाला काळसाईत,प्रियंका बारकूल,ग्रामसेवक आर यू हांडे आदी उपस्थित होते