7 मे 2024 रोजी कर्मचाऱ्यांना व कामगारांना पगारी सुट्टी मिळणार*

धाराशिव (माध्यम कक्ष)
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. कामगार/कर्मचारी/अधिकारी यांना मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या भागात कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे.ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहिल. अपवादात्मक परिस्थितीत पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदारांना किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील.याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.मतदार हे मतदानापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.मतदान क्षेत्रात असलेल्या कामगार,कर्मचारी, निवडणुक क्षेत्राबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना,खाजगी,आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना,उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समुह,महामंडळे, कंपन्या व संस्था,औद्योगीक उपक्रम किंवा इतर आस्थापना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी.
याबाबत काही तक्रार असलयास निराकरण करण्यासाठी धाराशिव येथिल सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असुन संबंधित कामगार,कामगार संघटनांनी दूरध्वनी क्रमांक 02472-224327 यांवर संपर्क साधावा.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.