ताज्या घडामोडी
श्री येडेश्वरी मंदिरावर भक्तांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या सावली शेड व जनरेटरचे खासदार व आमदार यांच्या हस्ते लोकार्पण

येरमाळा येथील श्री क्षेत्र येडेश्वरी मंदिरावर भक्तांच्या सोयी साठी उभारण्यात आलेल्या सावली शेड व जनरेटर चे लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. लोकार्पण सोहळ्या दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी येणाऱ्या काळात आई येडेश्वरी मंदिरासाठी व येरमाळा गावासाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ असा ग्रामस्थांपुढे शब्द दिला.यप्रसंगी येरमाळा विभागप्रमुख राहुल पाटील, तालुका संघटक विलास थोरबोले, पांडुरंग जाधवर, प्रा. सुनील पाटील, अनिल तात्या पवार,आबासाहेब रूमने, रमेश पवार नरसिंग पाटील,मारुती बारकुल, मुन्ना मोरे, नदीम मुलानी, येडेश्वरी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, पुजारी व शिवसैनिक उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील मलकापूर येथील विजय वनवे, किरण लोमटे, बालाजी लोमटे, समाधान बाराते, उपस्थित होते.