श्री सिद्धिविनायक परिवार आता इन्शुरन्स क्षेत्रात कार्य करणार-दत्ताभाऊ कुलकर्णी

कळंब/जयनारायण दरक
मागील दशकापासून ग्राहक, शेतकरी, खातेदार, सभासद, हितचिंतक यांच्या विश्वासास पात्र असलेला श्री सिद्धिविनायक परिवार आता विमा (इन्शुरन्स) क्षेत्रातही कार्य करणार आहे.
श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेट व जिल्हा पतसंस्था च्या सर्व शाखा च्या माध्यमातून ग्राहकांना आता सर्व प्रकारच्या जनरल वाहनाचा ,आरोग्याचा, वस्तूचा ,मशिनरी व अन्य जोखमीचा विमा याद्वारे काढता येईल. तसेच गुंतवणुकीचे पर्याय असलेली सर्व प्रकारचे विमा (इन्शुरन्स) आता काढता येतील.
देशातील प्रमुख विमा कंपन्या सोबत श्री सिद्धिविनायक परिवाराने याविषयी करार केलेला असून लवकरच सर्व शाखाच्या माध्यमातून सर्वच प्रकारचा विमा आता ग्राहकांना माफक सवलतीच्या दरात उपलब्ध होईल श्री सिद्धिविनायक परिवाराशी वेगवेगळ्या उपक्रम, उद्योगाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींना, ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.