ताज्या घडामोडी

येरमाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी विकी वाघमारे तर उपाध्यक्षपदी अमोल चंदनशिवे यांची सर्वानुमते निवड

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील  सिद्धार्थ नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त समितीची निवड करण्यात आली.यामध्ये जयंती समिती अध्यक्षपदी विकी बाळासाहेब वाघमारे तर उपाध्यक्षपदी अमोल चंदनशिवे यांची निवड करण्यात आली.

येरमाळा येथे दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्या अनुषंगाने आनंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून जयंती समितीची निवड करण्यात आली. यावेळी उर्वरित कार्यकारिणीत समितीच्या कोषाध्यक्षपदी नोबल कांबळे,सुरज कांबळे, सुहास कांबळे,सहसचिव दिलीप खलसे,मिरवणूक प्रमुख सुनील कांबळे, राजरतन कांबळे, मुरारी कांबळे,बाबुराव हजारे तसेच सदस्यपदी महादेव गरड, निखिल वाघमारे,नितीन कांबळे, राहुल चंदनशिवे,संतोष कांबळे,संदिप सोनवणे, सागर बोकेफोडे,पवन जगताप, अजय शिंदे,धम्मदीप वाघमारे,अमोल वाघमारे, सौरभ सरवदे,सतीश वाघमारे,महेश वाघमारे,तेजस भास्कर कांबळे यांची निवड करण्यात आली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.