धाराशिव तालुक्यातील.आंबेवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

आंबेवाडी ता.जि धाराशिव येथील भीम नगर मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, गावचे सरपंच पांडुरंग सुतार, ग्रामसेवक सौ वैशाली शिंदे, पोलीस पाटील भैरव दरेकर, पंचायत समितीचे माझी सभापती नानासाहेब कदम, माजी सरपंच नवनाथ शिरसागर, युवा नेते विनायक शेळके, या मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून हार घालून सामुदायिक रित्या त्रिशरण पंचशील घेऊन विनम्र अभिवादन करण्यातआले तसेच ध्वजारोहणचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला दादासाहेब राऊत,संतोष राऊत आबा राऊत दादासाहेब कांबळे, किशोर कांबळे, ज्येष्ठ नागरिक लिंबाजी राऊत,देविदास राऊत,दामोदर राऊत,मेसु राऊत रामहरी राऊत,यांच्यासह लहान मुलासह महिलां ही मोठ्या संख्येने उपस्थित होते