येरमाळा पोलीस ठाण्यात नव्याने रुजु झालेल्या सपोनि विलास हजारे हे करणार दुष्ट प्रवृत्तींचा संहार ?

येरमाळा येथील पोलीस ठाण्यात नव्याने रुजु झालेल्या सपोनि विलास हजारे हे पुर्वी संवेदनशील भागात काम केल्याने या अनुभवाच्या जोरावर येरमाळा गाव, पोलीस हद्दीतील व येडेश्वरी मंदिर परिसरात होत असलेल्या अवैध धंदे करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा संहार करतील अशी आशा सर्वसामान्य जनतेला वाटत आहे.
येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल पाटील यांची बदली जालना जिल्ह्यात झाली आहे.तर नव्याने येरमाळा पोलीस ठाण्याचा पदभार धाराशिव येथून आलेले सपोनि विलास हजारे यांनी घेतला आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गावठी दारु, देशी,विदेशी बनावट दारु अड्डे,अवैध धंदे यासह राष्ट्रीय महामार्गवरील वाटमारी, चोऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. गावठी दारुसह,बनावट देशी विदेशी दारु तयार करण्याचे अड्डे तसेच राष्ट्रीय महामार्गावरील धाब्यावरुन राजरोस बनावट देशी,विदेशी दारु विक्रीचे प्रकार सुरु आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसराला टायगर गेम नावाच्या नव्याच जुगाराचे ग्रहण लागले असून दर मंगळवार,शुक्रवार,रविवार भाविकांच्या गर्दी दिवशी दहा दहा झुगाराचे टेबल लागलेले असतात.या झुगाराच्या प्रकारामुळे मंदिर परिसरात झुगारात पैसे हरल्यामुळे वादातून मारहाणीचे प्रकार ही वाढले आहेत. मंदिर परिसरात खाजगी मालकीची वाहन पार्किंग वगळता अनेक जन अनधिकृत पार्किंग गोळा करतात.यामुळे पार्किंग पावत्या बनावट असल्याचे पाहून भाविक आणि पार्किंग वसुली धारकात नेहमीच वाद झुंपल्याचे चित्र दिसते.यावर कायम स्वरुपी पायबंद घालवा यासाठी ग्रामस्थ,भाविकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.
अशी मुख्य आव्हाने असून ते त्यांच्या पुढील आव्हानांना कसे तोंड देतात. याकडे पोलीस ठाणे हद्दीतील ३६ गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.