ताज्या घडामोडी
येरमाळा येथील जि.प. प्राथमिक कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लहू बारकुल यांची निवड

येरमाळा येथील जि.प. प्राथमिक कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे बिनविरोध गठन करण्यात आले यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लहु बारकुल यांची सर्वानुमते निवड झाली तर उपाध्यक्षा म्हणून दुर्गा प्रविण मोरे यांची निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून बालाजी बारकुल, शहनाज सय्यद, मारुती वाघमारे, सविता गायके, सतिष पवार, सचिन बारकुल, राधा लामतुरे, प्रियंका भालेकर आणि गणेश बारकुल यांची निवड करण्यात आली . यावेळी मुख्याध्यापक ठोंबरे एस.पी. ,वनवे सी.आर, उकीरडे एस.ए चेचे के.एस, डिडवळ यु.ए या शिक्षकांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.