ताज्या घडामोडी

मस्सा खं येथे बाळूमामाचा दरबार हा कर्यक्रम संपन्न

मस्सा खं…
कळंब तालुक्यातील मस्सा खं येथे अमावस्या निमित्त बाळूमामा मंदिर सभाग्राहत बाळूमामा चा दरबार हा कर्यक्रम बारा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळीआरती ने झाली असून सकाळी नऊ वाजता वरुडगावचे चे आप्पा देव व माळेगावचे तात्या देव यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ओविकार मंडळ नाडी ता. माढा च्या लताबाई लवटे व त्यांची मुलगी यांच्यात बाळूमामाच्या ओवीचा रंगतदार सामना झाला असून समाप्ती बाळूमामाच्या आरतीने झाली .यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी व भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते. बाळूमामा मंदिराचे पुजारी चंद्रकांत घाडगे व लक्ष्मण पितळे तसेच बाबा पितळे,रामलिंग वरपे,कोंडीबा थोरात,लक्ष्मण पितळे,दादा वर्पे, बळीराम वरपे,विनायक थोरात, आप्पा वरपे,नंदकुमार घाडगे व ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
समस्त भाविक भक्तांना नाना बिरू काळे व दादा शिरू काळे यांनी पंगत चा सर्व खर्च केला आहे. ते गावातील पूर्ण मस्सा खं शेत शिवराची राखणदारी करतात. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.