कळंब तालुक्यातील पोलीस पाटील भरती गाववार आरक्षण जाहीर

तेरणा काठ न्युज
कळंब तालुक्यातील रिक्त असलेल्या गावातील पोलीस पाटीलांच्या भरतीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि.०९ ऑगस्ट रोजी कळंब येथे प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या मध्ये कळंब तालुक्यातील एरंडगाव – अनुसूचित जाती, हासेगाव शि.- अनुसचित जाती, बारातेवाडी – अनुसचित जाती, लोहटा पूर्व – अनुसचित जाती महिला, पानगाव – अनुसचित जाती, कोठाळवाडी – अनुसूचित जमाती, वाकडी के. – अनुसूचित जमाती, अंदोरा – अनुसूचित जमाती, बोरगाव व., – विशेष मागासवर्ग, खामसवाडी – विमुक्त जाती अ महिला, वडगाव शि. – भटक्या जमाती ब महिला, निपाणी – भटक्या जमाती ब, चोराखळी – भटक्या जमाती क, वाणेवाडी – इतर मागास प्रवर्ग, नायगाव – इतर मागास प्रवर्ग महिला, गौर – इतर मागास प्रवर्ग, रायगव्हान – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, एकुरका – इतर मागास प्रवर्ग, खडकी – इतर मागास प्रवर्ग, दाभा – इतर मागासवर्ग महिला, जवळा खु. – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला, भाट शिरपूरा – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक,डिकसळ – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला, दहिफळ – सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , परतापूर – सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, खोंदला – सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग महिला, मस्सा खंडेश्वरी – खुला प्रवर्ग, मलकापूर – सर्वसाधारण महिला, ताडगाव – सर्वसाधारण प्रवर्ग, सौदना आंबा – सर्वसाधारण प्रवर्ग महिला, पाडोळी – सर्वसाधारण प्रवर्ग महिला, पिंपरी शि. – सर्वसाधारण प्रवर्ग, कन्हेरवाडी – सर्वसाधारण, भोगजी – सर्वसाधारण, उमरा – सर्वसाधारण, पश्चिम लोहटा – सर्वसाधारण, बोर्डा -सर्वसाधारण , नागुलगाव – सर्वसाधारण, बाभळगाव – सर्वसाधारण असे आरक्षण सुटले आहेत.