येरमाळा येथे नवरात्र महोत्सवानिमित्त होणार जागर स्त्री शक्तीचा

तेरणा काठ न्युज
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री येडेश्वरी नवरात्र महोत्सवानिमित्त खास महिलांसाठी जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येरमाळा व परिसरातील खास महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस या कार्यक्रमाची रंगत रंगणार आहे खास महिलांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजन करण्यात आले असून ०८ ऑक्टोबर २०२४ वेळ संध्याकाळी ७ ते ९ स्वर संगीत बार्शीतील सुप्रसिद्ध गायक स्वरसाधना ग्रुपचे समीर व सुजाता मॅडम यांचा गाण्याच्या कार्यक्रम व फन गेम्स सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम आहे तर * रात्री ९ ते १० यावेळेत दांडिया खेळला जाणार आहे या कार्यक्रमास मराठा संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पत्नी सौ. सौमित्रा मनोज जरांगे-पाटील प्रा. अंजली अशोक मोहेकर,सौ. स्वाती सचिन पाटील संस्थापक सदस्य, विद्यानिकेतन विद्यालय,सौ.सुनिता संतोष तौर ,सौ.शैला संजय बारकुल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, दि. ०९ ऑक्टोबर २०२४ वेळ : सायं. ७ ते ८ फन गेम्स सन्मान रात्रौ ८ ते ८:३० प्रा. नितीन कोळेकर भूम. नारी शक्ति सन्मानाचा इतिहास यांच्या व्याख्यांनाचा कार्यक्रम, रात्री ९. ते १० सन्मान स्त्री शक्तीचा दांडिया यावेळी प्रमुख उपस्थिती सौ संयोजनी ओमराजे निंबाळकर व शुभांगी कैलास पाटील, शुभांगी समाधान बारकुल,शितल धनंजय बारकुल यांची राहणार आहे
दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ ८ ते ८:३०
मायलेकी डान्स स्पर्धा. रात्री ९ ते १० दांडिया यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील,सौ. सरोजिनीताई संतोष राऊत, शर्मिष्ठा विकास बारकुल, सरपंच मंदाकिनी आबासाहेब बारकुल, सुनिता गणेश बारकुल यांची राहणार आहे प्रत्येक फन गेम मध्ये सहभाग घेण्यासाठी 10 रुपये प्रवेश फी घेण्यात येणार असून डॉ. सौ पल्लवी संदीप तांबारे,सौ. सुषमा अंकुश भगत, डॉ. सौ दैवशाला भगत, सौ वनमाला चंद्रकांत बारकुल,अमोल रामकृष्ण बारकुल,बालाजी शंकर बारकुल-यांच्यशी प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आयोजक अमोल रामकृष्ण बारकुल,. बालाजी शंकर बारकुल.सचिन भिवाजी नरहिरे, अंकुश भगत, श्री सुखानंद जंगम, अजिनाथ बेद्रे. शशिकांत अरुण बारकुल, सोमनाथ विठ्ठल बेद्रे सर,. संतोष गायके, सुखदेव गायके, उमेश भालेकर,. गोरख बारकुल यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.तसेच प्रत्येक फन गेम साठी आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आली आहेत तरी येरमाळा व परिसरातील महिला व मुलींनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.