ताज्या घडामोडी

आपली माती आपली माणसं सामाजिक युवा प्रतिष्ठान कडून 484 गरजू लोकांची तपासणी

कळंब/ जयनारायण दरक

कळंब तालुक्यातील वडगाव शि. येथे आपली माती आपली माणसं सामाजिक युवा प्रतिष्ठान आयोजित दि.१८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने घेतलेल्या महा-आरोग्य शिबीरास उदंड असा प्रतिसाद लाभला. या शिबिरात वडगावसह पाडोळी, निपाणी, वाठवडा, कोलेगाव, गौरगाव, नागुलगाव यासह परिसरातील अन्य गावातील नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळी तज्ञांच्या मार्फत गरजूंच्या आरोग्याची मोफत तपासणी करुन त्यांना औषध गोळ्याही विनामूल्य देण्यात आल्या.
या शिबिरात ४८४ गरजू लोकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. ८४ लोकांच्या डोळ्यांची तपासणी केल्यास २२ जनांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोळ्यावर लवकरच शस्त्रक्रिया करून उपचार केला जाणार असल्याचे सांगितले. ९३ लोकांनी रक्त तपासणी केली. तसेच तब्बल २२ तरूणांनी रक्तदानही केले. या वेळी कार्यक्रम मुरूड येथील प्रसिद्ध तत्र सर्वेश्री डॉ संदीप महाजन पाटील, डॉ बजरंग खडबडे, डॉ एस एम बोरकर, डॉ आनंद चव्हाण, डॉ शरयू कमलदीप कासार, प्रदीप पिसाळ या तज्ञांनी लोकांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी प्राथमिक उपचारासाठी गरजूंना औषध गोळ्या मोफत देण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून शिराढोण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपली माती आपली माणसं युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी ग्रामपंचायत मार्गदर्शक सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य उमेश ढेकणे, ग्रामपंचायत सदस्या बोंदर ताई, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपली माती आपली माणसं युवा सामाजिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.