सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जनहित पतसंस्था यांच्या वतीने येरमाळा येथे प्रशिक्षणाचे आयोजन

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब तालुक्यातील येरमाळा येथे सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व जनहित पतसंस्था येरमाळा यांच्या वतीने दि 28 /06/ 2025 ते 29 / 06/ 2025 वार शनिवार व रविवार रोजी दोन दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन शनिवारी सकाळी10:30 वाजता मा श्री बालाजी एच सावतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कळंब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संतोष तौर निमंत्रीत सदस्य महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था मुंबई तथा सहकार भारती लातूर सहविभाग प्रमुख राहणार आहेत प्रमुख पाहूणे बी जे ठोबरे प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व उपप्राचार्य जी ए जाधव सर हे राहणार आहेत तर तज्ञ व्याखाते मा श्री एन एन कुलकर्णी हे संचालक व कर्मचारी यांना विविध कर्ज वाटप करताना घ्यावयाची दक्षता व कागदपत्रे , वसुली कायदा व अडथळे ठेवी स्विकरताना घेतली जाणारी काळजी व कागदपत्रे 97 व्या घटना दुरुस्ती व संचालक व सभासद यांच्या जवाबदाऱ्या नियमक मंडळ इ विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर सहभागी संस्थाच्या प्रतिनिधी ना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व सहकारी पतसंस्थानी सहभाग नोंदवावा असे आवाहन शिवप्रसाद घेवारे यांनी केले आहे