ताज्या घडामोडी

कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त ‘बालदिंडी सोहळा’ संपन्न 

संस्कारांची जपणुक व सर्वधर्मसमभावाची शिकवण देत रंगला' बालदिंडी सोहळा'

तेरणा काठ न्युज 
कळंब येथील कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल मध्ये  आषाढी एकादशी निमित्त ‘बालदिंडी सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .विठ्ठल रुक्मिणी च्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष.रवी नरहिरे संस्थापिका आशा नरहिरे .तसेच मुख्याध्यापक संतोष आळंदकर उपमुख्याध्यापक विवेक अष्टेकर हे उपस्थित होते .
या कार्यक्रमांच्या प्रमुख अतिथी म्हणून खेर्डा .येथील नजमून अजमेर शेख उपस्थित होत्या

या प्रसंगी शाळेमध्ये चिमुकल्यांची ‘बालदिंडी’ काढण्यात आली  तसेच  विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायावर आधारित बहारदार नृत्य सादर करून संस्कृतीची जोपासना केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.अर्चना बावीकर यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक . विवेक अष्टेकर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष .रवी नरहिरे व संस्थापिका .आशा नरहिरे यांनी या बाल वारकऱ्यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला .

अतिथी यांचा यथोचित सन्मान 

गेल्या 20 वर्षांपासून खेर्डा या गावी शेख कुटुंबिय आषाढी दिंडीसाठी अन्नदान करत असून आपल्या गावामध्ये सप्ताह बसवण्याची सुरुवात देखील प्रथम त्यांनीच केली आहे .या सप्ताहात त्यांची पहिली पंगत असते .तसेच त्या अंगणवाडीच्या आशा कार्यकर्त्या असून एस .बी .आय . च्या विमा एजंट म्हणून देखील काम करतात .सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्यामुळे सर्वधर्म समभावाची शिकवण रुजवण्यासाठी व माणुसकीचे मूल्य जपण्यासाठी शाळेने श्रीमती नजमून शेख यांचा यथोचित सत्कार केला .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.