ताज्या घडामोडी

दहीफळच्या खंडोबा देवाच्या यात्रेत कुस्त्यांचा फड रंगला

योगीराज पांचाळ दहीफळ प्रतिनिधी
दहिफळ : कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा पार पडल्या. अखेरची कुस्ती विकास बनसोडे व रविंद्र खैरे यांच्यात होऊन या चुरशीच्या लढतील रवींद्र खैरे यांनी बाजी मारत ११ हजार १ रुपयांचे बक्षीस जिंकले.

दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा दि.१८ पासून सुरु झाली आहे. यानिमित्त गावामध्ये सोंगे मिरवणूक, विविध धार्मिक कार्यक्रम व मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाचा परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला. शेवटच्या दिवशी बुधवारी दुपारी कुस्ती स्पर्धा पार पडली. यामध्ये दहिफळ, वानेवाडी, सापनाई, गौर, येडशी अवधूतवाडी, परतापूर, बाभळगाव, पानगाव, कुडुवाडी, परंडा, शेलगाव, तेरखेडा आदी गावातील मल्लांनी सहभाग नोंदविला. अखेरची लढत रवींद्र माने या मल्लाने जिंकली. यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा सरपंच चरणेश्वर पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.