येरमाळा येथील सिद्धार्थनगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

येरमाळा येथील सिद्धार्थ नगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन व ध्वजारोहनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमीत्त जयंती समितीच्या वतीने आज दि.14 रविवार रोजी प्रतिमा पुजन व ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि महेश क्षिरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक शरद वाठोरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी सरपंच विकास बारकुल, मुरहारी कांबळे, उपरसपंच गणेश बारकुल, माजी पं . स. सभापती छाया वाघमारे, सचीन राजेंद्र बारकुल,राहुल पाटील, विलास थोरबोले, संजय बारकुल, सुहास बारकुल, निशीकांत गायकवाड, धनंजय बारकुल, पांडुरंग जगताप, बाबुराव हजारे,देवानंद बारकुल, यांच्यासह जयंती समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी व सिद्धार्थ नगर मधील ग्रामस्थ महिला उपस्थित होते .