ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने लहुजी साळवे जयंती उत्साहात साजरी

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात क्रांतिपीता लहुजी साळवे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा समाज आरक्षणासाठी लढा देणारे व आमरण उपोषणकर्ते श्री. रमेश साहेबराव शेळके यांच्या हस्ते क्रांतिपीता लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पत्रकार सुनिल पाटील, शिवाजी बोबडे, दिपक सावंत, गोपाल शेळके,मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील,भाजपाओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस सावता माळी, सुधाकर शेळके, बाळासाहेब पाटुळे, भिमराव कांबळे, अशोक पाटुळे, सुरेश महादेव पाटुळे,आबा भिमराव पाटुळे, सतिश सावंत,दिपक सावंत, महावीर पाटुळे, धनंजय कांबळे, सतिश पाटुळे यांच्या हस्ते ही प्रतीमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.