ताज्या घडामोडी

रुईभर येथील एका शेतकरी पुत्राने मिळवले MPSC परीक्षेत घवघवीत यश.

आकाश चव्हाण, रुईभर प्रतिनिधी

.
रुईभर येथील भीमराव वडवले हे एक गरीब व अल्पभूधारक शेतकरी. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीचे होती. परंतु त्यांच्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र कष्ट केले.व मुलाचे शिक्षण पूर्ण केले.त्यांचा मुलगा राज भीमराव वडवले हा बालपणापासूनच खूप हुशार,मेहनती,कष्टाळू,जिद्दी, होता.
त्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जयप्रकाश विद्यालय रुईभर या ठिकाणी झाले . पुढे त्यांचे शिक्षण लातूर या ठिकाणी झाले. नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. व त्यांनी MPSC ची परीक्षा देखील दिली. पहिल्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश आले नाही.पण त्यांनी अभ्यासावरील सातत्या कायम ठेवले,आणि दुसऱ्यांदा परीक्षा दिली.
काल परीक्षेचा निकाल लागला आणि ते महाराष्ट्रात MPSC च्या परीक्षेत पाचव्या क्रमांकावर परीक्षा पास झाले. इतर मागास बहुजन विकास अधिकारी.( राजपत्रित गट- ब).
त्यामुळे त्यांचे रुईभर व आसपासच्या परिसरामध्ये कौतुक होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.