कन्हेरवाडी शिवारातील टिप्परमधील 375 लिटर डिझेल चोरीला-

जयनारायण दरक /कळंब –
-कळब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील राजेंद्र मिटकरी मु.पो.कन्हेरवाडी यांनी कळंब पोलीस स्टेशन येथे टिप्पर ड्रायव्हर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की राजेंद्र मिटकरी यांनी मागील दीड महिन्यापूर्वी बारामती येथील टिप्पर मालक मनोज भोसले रा. राजेगाव ता.दौंड जि.पुणे यांच्याकडून कोठाळवाडी लहू पाझर तलावातील शेतात गाळ टाकण्याकरिता पाच टिप्पर ची मागणी केली होती त्यानुसार त्यांच्या शेतात गाळ टाकण्यासाठी पाच टिप्पर मागील काही दिवसांपासून काळ टाकण्याचे काम सुरू आहे दिनांक 25 एप्रिल च्या सायंकाळी नऊच्या नंतर दिनांक 26 एप्रिल च्या पहाटे सात वाजेपर्यंत टिप्पर क्रमांक MH-42 T 0236 या टिप्परवर चालक म्हणून आशिष मोंडल रा.नकफुल,सभाईपुर,बोनगाव 24 परगना उत्तर पश्चिम बंगाल कलकत्ता हा चालक टिप्पर वर काम करत असताना त्याने टिपर क्रमांक MH-42 AQ 5536 मधील 125 लिटर याची किंमत 11445 रुपये तर दुसरे टिपर क्रमांक MH-42 T 0236 मधील 150 लिटर याची किंमत 13734 रुपये तर तिसरे टिप्पर क्रमांक MH 42-T 0636 मधील 100 लिटर याची किंमत 29156 असा एकूण 34335 रुपयेचे डिझेल चोरून नेले आहे म्हणुन राजेंद्र मिटकरी यांच्या फिर्यादीवरून दिनांक 27 एप्रिल रोजी टिप्पर चालकाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 379 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा पुढिल तपास पो.हे.काॅ.बाळासाहेब तांबडे हे करत आहेत तर राजेंद्र मिटकरी यांनी या टिपर चालकाने डिझेल चोरून कन्हेरवाडी गावातच विक्री केल्याचा संशय आहे व या अगोदर पण दोन वेळेस डिझेल चोरले होते असे दै तेरणा काठशी बोलताना सांगितले आहे.