ताज्या घडामोडी

मंगरूळ मध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त मदर डेअरी यांच्यातर्फे सर्व दूध उत्पादकांना मिठाईचे वाटप

कळंब/जयनारायण दरक
कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील मदर डेरी तर्फे अजय मनगिरे साहेब (मदर डेरी येरिया ऑफिसर ) व डॉ.बाबासाहेब कुंभार व किशोर माळी (पी.एस.आय.) ,दत्तात्रय जाधव (आदर्श पतसंस्थेचे चेअरमन )यांच्या हस्ते सर्व दूध उत्पादकाना मिठाईचे वाटप करण्यात आली.
यावेळी वरील मनगिरे साहेबांचा व कुंभार साहेब,माळी साहेब, जाधव साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच सूत्रसंचालन वैभव (भैय्या) काळें यांनी केले.
यावेळी चंद्रकांत रितापुरे, बाळासाहेब नागटिळक, सलीम शेख, दिलदार पठाण व सर्जेराव रितापुरे, औदुंबर रितापुरे, इक्बाल शेख, राहुल भोसले, व इतर दूध उत्पादक शेतकरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.