येरमाळा विभाग शिवसेना ( उ.बा.ठा.) च्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

तेरणा काठ वृत्तसेवा — कळंब तालुका शिवसेना ( उ.बा.ठा.) च्या सचिवपदी येरमाळा येथील नदीम मुलाणी यांची तर संजीतपुर येथील समाधान बाराते यांची धाराशिव- कळंब विधानसभा संघटकपदी व कळंब तालुका नुतन शिवसेना प्रमुखपदी सचिन काळे यांची नियुक्ती झाल्याने येरमाळा विभागाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या.यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नदीम मुलाणी हे शिवसेनेचा प्रचार व प्रसार जोमाने करीत आहेत. शासकीय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकास न्याय मिळाल्याने येरमाळा परीसरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच भाग म्हणून येरमाळा विभाग शिवसेनेच्यावतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी विभाग प्रमुख राहुल पाटील,अनिल पवार, सुनिल पाटील, विलास थोरबोले, अमोल पाटील, लहु बारकुल, गोविंद मुंढे, भिवाजी सिरसट, मारुती बारकुल, गणराज देशमुख, सुंदर लोमटे, रोहित घेवारे,मल्हारी कसबे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.