ताज्या घडामोडी

येरमाळा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला सर्वरोगनिदान शिबीर संपन्न

येरमाळा ग्रामपंचायत यांच्यावतीने राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त महिलांचे सर्वरोग निदान आरोग्य शिबीर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी संजय पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रा अर्जुन जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विकास बारकुल , जि.प.सदस्य मदन बारकुल,सरपंच सौ.सुजाता देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी प्रा.अर्जुन जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत इतिहासातील जिजाऊ माँ साहेब यांच्या शौर्याच्या घटनांचा उल्लेख करत मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी संजय पाटील बोलताना म्हणाले की, महिला याच घरांची चांगली काळजी घेतात परंतु यासोबतच महिलांनी आरोग्यांची काळजी घ्यावी असे महिलांना आवाहनही केले याकार्यक्रमात दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच गणेश बारकुल यांनी केले सूत्रसंचालन संतोष पोतदार तर शेवटी आभार मदन बारकुल यांनी मानले. या शिबिरात पाचशेहून अधिक महिलांनी आरोग्यांची तपासणी करून घेतली या शिबिराचे नियोजन स्वाधार महिला स्वयंसेवी संस्था धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.