MSB अर्बन चा ४ था वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

येरमाळा प्रतिनिधी- MSB अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटी लि येरमाळा बँकिंग क्षेत्रात उतरून आज(23 जानेवारी) चार वर्ष पूर्ण झाली आणि पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. त्यानिमित्त गावातील महिलांसाठी हळदी कुंकू व अल्पोपहार कार्यक्रम आयोजित केला त्यानिमित्त अनेक महिला उपस्थित होत्या.
येरमाळा गावातील बालाजी शंकरराव बारकुल या एम ए, बी एड सुशिक्षित बेरोजगार युवकाने शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत न राहता स्वतः बँकिंग क्षेत्रात यायचं ठरवलं आणि आपल्या आई-वडिलांच्या नावाने MSB अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीने लोकांच्या जपलेल्या विश्वासाच्या जोरावर रोपट्याचा वटवृक्ष करण्याचा निश्चय करुन बालाजी बारकुल व नितीन बारकुल यांनी मेहनतीने MSB अर्बनच्या माध्यमातून येरमाळा तसेच परिसरातील लोकांना आपल्या हक्काची संस्था वाटावी असे काम केले आहे. बेकारीत इतरांना दोष देत बसलेल्या युवकांना कुठेतरी आशेचा किरण दाखवण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करत आलेत MSB अर्बन संस्थेच्या माध्यमातून, मागील चार वर्षात हजारो लोक जोडले गेले, हे कार्य करीत असताना महिलांसाठी संक्रांत सण हा नुकताच होऊन गेला असल्याने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी खास हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.