ताज्या घडामोडी

एस.टी.बसमध्ये जागा पकडण्याच्या धावपळीत ७६ वर्षीय प्रवाशाचा बसच्या चाकाखाली चेगरुन मृत्यू

कळंब/जयनारायण दरक-

कळंब आगारात गाडीला गर्दी असल्याने जागा पकडण्याच्या धावपळीत 76 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी काळेगाव येथील महादेव केरबा दिवार रा काळेगाव ता केज येथील वय अंदाजे 76 वर्ष बस मध्ये जागा पकडण्याच्या गडबडीत बस क्र. MH14 BT 1632 या बसच्या डावीकडील पाठीमागच्या चाकाखाली चेंगरुन मृत्यू झाला आहे.या बसचे चालक डी व्ही शिंदे हे होते.ही घटना दि.24 मार्च रोजी दु 04 ते 04 :30 च्या दरम्यान घडली आहे.
या घटनेमुळे कळंब आगारात मोठी खळबळ उडाली असून कळंब आगारचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.सध्या येरमाळा येथील यात्रा सुरू असल्याने कळंब आगारात भाविकांची मोठी गर्दी आहे.या गर्दीत प्रवाशांना बस मध्ये बसण्याची गडबड होत असल्याने आशा घटना घडत आहेत.तर कळंब आगारातील गाडी लावण्याव्हे नियोजन व बेशिस्त पणा मुळे दिवार यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.महादेव दिवार हे दि 24 एप्रिल रोजी काळेगाव येथून प्रपंचासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांची पत्नी तारामती दिवार यांच्या सोबत आल्या होत्या सगळी खरेदी झाल्यानंतर वापस काळेगाव कडे जाताना बस मध्ये गमजा टाकण्याच्या गडबडीत ही घटना घडली असल्याचे आगाराचे व्यवस्थापन यंत्रणा सांगत आहे.महादेव दिवार यांच्या पश्चात पत्नी 2 मुले व 2 मुली आहेत.या घटनेचा मुख्य तपास होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.