ताज्या घडामोडी
वाढदिवस व नवीन वर्षानिमित्त चार भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा
कळंब
श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालक आश्रम तांदुळवाडी रोड येथे नवीन वर्षानिमित्त व पत्रकार तथा अभय वार्ता न्यूज चे संपादक जयनारायण दरक यांच्या वाढदिवसानिमित्त
डिकसळ, तांदळवाडी, बोर्डा , एसटी कॉलनी कळंब, व हनुमान मंदिर कळंब या चार ठिकाणच्या (भजनी मंडळ ) वारकऱ्याकडून भजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश (बप्पा) टोणगे व ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव (बप्पा) आडसूळ यांनी जयनारायण दरक यांचा सत्कार केला. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने महिला व पुरुष भजनी मंडळ व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी केले .