ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाचा आज मोर्चा

धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा, धनगर समाज एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावेत या एकमेव मागणीसाठी दि. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.भारतीय राज्य घटनेत आरक्षण असताना सुध्दा केंद्र शासनाने व राज्य शासनाने धनगर समाजाला उपेक्षित ठेवले. राज्य घटनेत दिलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून, रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज झाला आहे त्या अनुषंगाने हा मोर्चा दि. ३० नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी १० वाजता लेडीज क्लब पासून सुरू होवून संत गाडगेबाबा चौक ,बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहे. त्यासाठी धनगर समाजातील अहिल्यादेवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाज जिल्हा धाराशिव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.