गुन्हा करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी फिरत असलेला संशयी इसम पोलीसांच्या ताब्यात

येरमाळा पोलीस ठाणे : येरमाळा पो.ठा.चे पथक दि. 08.04.2024 रोजी 03.15 वा.सु. येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान येरमाळा ते पानगाव रोडवर हॉटेल अनुष्का चे बाजूस खड्यामध्ये अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सावळराम सायबा शिंदे, वय 35 वर्षे, रा. फुलेनगर पाथरी जि. परभणी 2) जयसिंग विठ्ठल नाईक वय 58 रा. माळीवाडा ता. पाथ्री जि. परभणी असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.