ताज्या घडामोडी
सापनाई येथील अशोक संजय बाराखोते यांनी मिळवले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश

कळंब तालुक्यातील सापनाई येथील अशोक संजय बाराखोते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले असून class 1 अधिकारी पदी निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील एका छोट्या गावातील अशोक बाराखोते या मुलाने आपल्या इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे, खेड्यात जन्म झाला असला तरी इच्छाशक्ती असेल तर मोठ्या पदावर माणूस जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे, यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..
अशोक बाराखोते यांचा आमदार कैलास दादा पाटील यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी राहुल पाटील दादा ताकमोगे, संजय बाराखोते, सुनील बाराखोते, खंडू भातलवंडे, बापू बाराते, वैभव कुलकर्णी, नदीब मुलानी, ऋषिकेश ताकमोगे, तुषार बाराते, अशोक बाराते, समाधान बाराते, राहुल ताकमोगे उपस्थित होते.