ताज्या घडामोडी

तरुणांचे प्रेरणास्रोत असणारे शिवाजी महाराज यांचा शिराढोण गावात एका तरूणाने घरांवर उभा केला आश्वरुढ पुतळा

 

कळंब/जयनारायण दरक

छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण जगाला प्रेरणा देणारे एक दैवी व्यक्तीमत्व महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले असल्याने प्रत्येकाचे आराध्यदैवत,त्या दैवताप्रतिनिष्ठा प्रर्दशित करण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो अशाच वेगळया तर्हेने महाराजांच्या विचारावरील आपली निष्ठा दाखवत महाराजांचा अश्वरुढ पुतळा घराच्या छतावर उभारुन कळंब तालुक्यातील शिराढोण मधील.नितीन लक्ष्मणराव पाटील शिवभक्तांनी आपली निष्ठा व्यक्त केली आहे.
नितीन लक्ष्मणराव पाटील आशा या ध्येयवेड्या शिवभक्तास अगदी लहानपणापासुनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदल आकर्षण होते .नितीन पाटील यांनी प्रत्यक्ष जिवनामध्ये प्रचंड संघर्ष करुन आज गाव परीसरामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. संघर्षशिल प्रयत्नवादाच्या माध्यमातुन स्वताची स्वप्न सत्यात उतरताना महाराजांचे आकर्षण व प्रेम यात किंचितही कमी होवु न देता त्यात वृध्दी करण्याचा प्रयत्न त्यांनी मनापासुन केला याचाच भाग म्हणुन स्वप्नातील घरकुल साकरल्या नंतर त्याच घरकुलाच्या छतावर महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभारुन जणु त्यांनी आपल्या शिवनिष्ठा दाखवून दिली आहे केले परिसरात घराच्या छतावर पुतळयाची उभारणी केलेले एकमेव घर असल्याने पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमी येत असतात. पुतळा उभारणीसाठी पंधरा लाख रुपयाचा खर्च आला होता. नितीन पाटील यांनी सांगितले तसेच छत्रपती शिवाजी महाराज तमाम मानव जातीचे आराध्य दैवत असुन मानवी जीवन जगताना मानुस म्हणुन त्यांनी घालुन दिलेली मापदंड हे अखिल मानव जातीसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. तिच प्रेरणा उराशी बाळगुन त्या प्रेरणेचा प्रकाश गाव व परिसरात अखंडपणे प्रकाशित करीत राहावा. हाच घराच्या छतावर पुतळा उभारण्याच्या उदेश आहे. असे नितीन पाटील यांनी तेरणा काठ प्रतिनिधीसी बोलताना सांगितले

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.