ताज्या घडामोडी

कैलास बोराडे यांचेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या*. ..*सकल धनगर समाज कळंब यांची मागणी

तेरणा काठ वृत्तसेवा
कळंब:- अन्वा ता भोकरदन जि जालना येथील कैलास गोविंद बोराडे (३६ वर्ष) यांचा कांही नराधमांनी अमानुषपणे छळ करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी संबंधितांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी कळंब तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.
कैलास बोराडे यांना १ मार्च रोजी अन्वा ता भोकरदन येथील समाजकंटकांनी चुलीवर गरम केलेल्या लाल सळईने शरीरावर विविध ठिकाणी १६ डाग देऊन गंभीररीत्या जखमी केले . कांही जखमा शरीराच्या प्रायव्हेट पार्टवर देखील आहेत.
या पाशवी नराधमांना तात्काळ अटक करून मकोका लावावा व कठोरारात कठोर फाशी ची शिक्षा द्यावी अशी मागणी कळंब तालुका सकल धनगर समाज बांधवांकडून करण्यात येत आहे. अशा आशयाचे निवेदन कळंब तहसीलदार महोदयांना देण्यात आले.
तहसीलदारांच्या वतीने  गोपाळ भराडिया नायब तहसीलदार यांनी निवेदन स्विकारून वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन देण्यात आले. निवेदनावर अजित गायके, पांडुरंग लोकरे,डॉ रामकृष्ण लोंढे,संतोष घाटूळे,झेलम शिंपले,श्रीकांत मैदांड, सुभाष मैंदाड,नेताजी हारकर, यांच्या स्वाक्ष-या आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.