ताज्या घडामोडी

राजकारणावर गप्पा मारणाऱ्या टोळ्या सोशल मिडियात सक्रिय ! मतदारांची होतेय करमणूक !!

तेरणा काठ वृत्तसेवा

विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपल्याच पक्षाचे पारडे कसे जड आहे ? हे सोशल मिडायातून दाखविण्याचा प्रयत्न केला तरीही याचा मतदारांना प्रभावित करण्यासाठी फायदा होत नसून, उलट मतदारांची करमणुक होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच खरे काय ? ते कळणार आहे. हे मात्र तितकेच खरे आहे. परंतु तोपर्यंत कोणाचे पारडे जड आहे ? असा प्रचार करणा-या टोळ्या मात्र संपूर्ण जिल्हाभरात सोशल मीडियावर सुरू आहे.

धाराशिवसह जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रचार यंत्रणा हायटेक होत असून, एकास एक लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून आमक्या उमेदवारांचे, तमक्या उमेदवारांचे पारडे जड दाखविणा-या टोळ्या सोशल मीडियावर सक्रिय झाल्या आहेत. सोशल मिडायावरील आशा टोळ्यांमुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस प्रचार यंत्रणा हायटेक होत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाचे पारडे जड ? हा सर्व्हे दाखविण्यासाठी सोशल मिडियाचा आधार घेतला जात असला तरीही हा प्लॅटफॉर्म मतदारांच्या करमणूकीचा विषय ठरला आहे. , धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात महायुतीसह महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात होणा-या लढतीचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मतदारसंघात आपलेच पारडे जड ? हे चित्र दाखविण्यासाठी सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याची चर्चा पारावरच्या गप्पात जोरदारपणे रंगली जात आहे. या प्रचारात आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचे पारडे कसे जड आहे ? हे दाखविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्त्यांना अगोदर प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष करून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचे पारडे कसे जड आहे ? हे दाखवण्यासाठी आपल्याच हितचिंतकांना सोशल मिडायासमोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही सांगितले जात आहे. सोशल मिडायावरील टोळ्याही अगोदरच मॅनेज केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे .त्यामुळे कार्यकर्तेही सोशल मिडिया समोर आपल्याच पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने कौल देण्याची प्रतिक्रिया देत असल्याचे पारावरच्या गप्पांतून ऐकण्यास मिळत आहे. म्हणून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता पारावरच्या गप्पामध्ये विनोदाचा विषय ठरू लागल्या आहेत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.