ताज्या घडामोडी

येरमाळा येथे ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रावर स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा 
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रावर भव्य स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमांमध्ये 50 समर्पित ब्रह्मकुमारी भगिनींनी आपला सहभाग नोंदवला .
प्रथमतः गावामध्ये भव्य शोभायात्रा ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली तसेच गावातील रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून फुले टाकून ब्रह्मकुमारी यांचे औक्षण करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सोलापूरहून आलेल्या सबइन्चार्ज सोमप्रभा दिदिनी सभेला संबोधित करताना म्हणाल्या की येरमाळा गावामध्ये मूल्य शिक्षणाचे हे कार्य असेच उन्नती करत वाढत राहो. स्नेहमिलनाचा मुख्य हेतू जनतेला प्रेम, भाईचारा, सद्भभावना शिकवण्याच्या आहे. केंद्रप्रभारी बी. के. वैजनाथ भाईजींनी सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्दल आभार व्यक्त केले तीनशेहून अधिक साधकांनी आपला सहभाग नोंदवला व शेवटी प्रसाद ग्रहण करून प्रस्थान केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.