ताज्या घडामोडी
येरमाळा येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळेस येरमाळा शिवसेनेचे मार्गदर्शक अनिल तात्या पवार, येरमाळा विभागाचे विभाग प्रमुख राहुल पाटील, केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक अनिल बारकुल , केंद्र प्रमुख भाऊसाहेब जाधवर , शिवसेना शहर प्रमुख मारुती बारकुल, माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम गुरव, मुन्ना मोरे, नदीम मुलानी, नितीन बारकुल, नागेश तोडकरी, किरण शेटे, अशोक साळुंखे, रजाक शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.