पुलाजवळ पडलेल्या खड्ड्यांमुळे मोटारसायकल स्वारांचा मृत्यू :: गुत्तेदारासह इतरावर गुन्हा दाखल

कळंब तालुक्यातील मौजे जायफळ येथील उत्तम श्रीरंग नरसिंगे यांचा शिराढोण -जायफळ रोडवर खोदकाम सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यात पडून दि.२० मार्च रोजी रात्री ७.०० ते ९.०० वाजण्याच्या सुमारास अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित गुत्तेदारांसह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, जायफळ-शिराढोण रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामवर कसल्याही प्रकारचा फलक, रिफ्लेक्टर अथवा पत्रके लावण्यात आलेली नाहीत. त्यामुळे उत्तम नरसिंगे हे शिराढोण मार्गे जायफळकडे येत असताना सदरील पुलाच्या खड्ड्यात त्यांची दुचाकी गेली अन् त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. उत्तम नरसिंगे यांच्या मृत्यूबद्दल अमर उत्तम नरसिंगे यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये संबंधित गुत्तेदार संदीप मढके यांच्यासह अन्य ईसमा विरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती शिराढोण पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर यांच्यासह त्यांची टीम करत आहे.