लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश युवक उपाध्यक्षपदी रोहित खलसे यांची निवड

धारशिव जिल्ह्यातील.येरमाळा येथील रोहित खलसे यांची लहुजी शक्ती सेना या लढाऊ सामाजिक संघटनेच्या युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली
लहुजी शक्ती सेना ही संघटना बहुजन समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी कार्य करते. या संघटनेमुळे बहुजन समाजातील अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आलीआहेत. बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना नेहमीच लढाऊ पद्धतीने काम करते.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे, लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे यांच्यासह राज्य पातळीवर कार्यरत असणाऱ्या. देशाच्या सामाजिक चळवळीत कार्यरत कर्तृत्वसंपन्न अग्रणी शिलेदारांच्या समितीने त्यांची निवड केली आहे.
या निवडीबद्दल विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड हेमंत खंदारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी असंख्य समाज बांधव आणि भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले असून या निवडीबद्दल . रोहित खलसे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे