ताज्या घडामोडी

डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाचा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून होणार सन्मान

तेरणा काठ न्युज 
आगामी काळात येणाऱ्या गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक येरमाळा पोलीस ठाणे येथे संपन्न.या बैठकी एक गाव एक गणपती आणि डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना राबविण्याण्या बाबत पोलीस प्रशासनकडून पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.दरवर्षी प्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करणाऱ्या गणेश मंडळाना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सन्मान केला जाणार आहे.

शनिवारी वार (ता.३१ ) येरमाळा पोलीस ठाण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी काळात होणाऱ्या गणेश उत्सव ईद ए मिलादच्या अनुषंगाने शांतता बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये एक गाव एक गणपती व डी.जे.मुक्त गणेशउत्सव संकल्पना राबवण्याबाबत आव्हान करण्यात आले.एक गाव एक गणपती संकल्पनेची सुरुवात येरमाळा येथुन झाली ती संकल्पना पुढे राज्यभर राबवली गेली तशीच डीजे मुक्त गणेशोत्सव संकल्पना जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी करुन साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आले.ही संकल्पना यशस्वी झाली तर पुढे ती राज्यभर राबवली जाईल यावर चर्चा झाली.
या बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,सपोनि महेश क्षीरसागर,येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत गावातील पोलीस पाटील,गणेश मंडळाचे पदाधिकारी,येरमाळा डॉक्टर असोसिएशन चे पदाधिकारी शांतता,कमिटीचे सदस्य हजर होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.