ताज्या घडामोडी
अवकाळी पावसात वीज पडून सात शेळ्यांचा मृत्यू तर एक शेतकरी जखमी

मुरूम, (प्रतिनिधी) : येथील शिवारालगत शिव मारुती रोडवर असलेल्या शेतात शेळीपालन करणारे बिया शेख कारभारी हे शेताच्या बंधाऱ्यावर शेळी चारत असताना अचानक आलेल्या अवकाळी पाऊसात शेळ्या झाडाखाली थांबल्या होत्या. अचानक त्या ठिकाणी वीज पडून सात शेळ्या जागेवरच मृत्युमुखी पडल्या तर मुरुम येथील अशोक तुकाराम देडे हे जखमी झाले. जखमीवर मुरूम ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश आरदले यांच्या तपासणीनंतर उमरगाचे तहसीलदार यांनी या घटनेची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे..