ताज्या घडामोडी

डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

तेरणा काठ वृत्तसेवा

येडाई व्यसनमुक्ती केंद्रात डॉक्टर असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . :आयुष व्यसनमुक्ती केंद्र व येडाई व्यसनमुक्ती केंद्र,यश मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष डॉ. संदीप तांबारे व संचालक डॉ. पल्लवी तांबारे तसेच डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ. राजकुमार घुगे ,केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष जाफर शेख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .डॉ. पल्लवी तांबारे यांनी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा संदेश दिला व शैक्षणिक योगदान सामाजिक क्रांतीतील सावित्रीबाई विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अमित मुंढे ,डॉ. देवशाला भगत,डॉ. सचिन पवार व केमिस्ट नयन मुंढे ,गणेश मुंढे ,सुरज वनवे,रोहित वाघमारे,चैतन्य चाळक,सौरभ वैरागी,काश्मीर शेख  उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजेन्द्र  शामकुळे यांनी केले व आभार प्रदर्शन जाफरभाई शेख यांनी मानले .

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.