ज्ञानोद्योग विद्यालयात दहावी 1999-2000 ची बॅच यांचा वर्ग मित्राचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा
ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येरमाळा येथे आज दि.03/11/2024 रोजी इयत्ता दहावी 1999-2000 ची बॅच यांचा वर्ग मित्राचा स्नेह मेळवा घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी तत्कालीन गुरुजन वर्ग उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य श्री. पौळ एस. एल. होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमोल बारकुल यांनी केले. आभार श्री. पांगारकर सर यांनी मानले. सन 1999-2000 च्या बॅचला शिकवणारे शिक्षक श्री. मुळे सर , श्री. बारकुल डी. आर, श्री. बारकुल भाऊसाहेब अप्पा, श्री. देशमुख सर, श्री. बारकुल पी एम., श्री. पाटील एस. एम. श्री. पाटील एस.पी., श्री. कुलकर्णी अशोक, श्री. कोठावळे सर, श्री. रामटेके सर, श्री. गिड्डे सर, श्रीमती बनसोडे मॅडम, श्री. पेजगुडे सर, श्री. पौळ एस. एल. यांनी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडला.