ताज्या घडामोडी

कळंब येथे घरगुती गॅसच्या स्फोटात कदम कुटुंबीयांच्या घरातील सामान जळून खाक 

कळंब :- कळंब शहरातील कसबा पेठ भागातील बंडू कदम यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्याने घरातील भांडी ,सामान जळून खाक झाल्याने कुटुंबीयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 17 जून रोजी सकाळी दहा च्या सुमारास गॅस एजन्सीच्या वतीने गॅस सिलेंडर जोडणी करण्यात आली यानंतर घरातील महिला रंजना कदम गॅस पेटवीत असताना अचानक गॅस सिलेंडर ने पेट घेतला व त्याचा स्फोट झाला या मुळे लागलेल्या आगीत घरातील संसार उपयोगी भांडे वस्तू व इतर सामान जळून खाक झाले व घराच्या पत्र्याच्या आडूने देखील पेट घेतल्याने पत्रे कोसळले परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीने दूरध्वनी द्वारे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना बोलावले त्यांनी प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात येत नव्हती कळंब नगरपरिषद अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी पोहोचण्यास एक ते दीड उशीर झाला असल्याने नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.