ताज्या घडामोडी
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त येरमाळा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग निधीचे वाटप

तेरणा काठ वृत्तसेवा
येरमाळा येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर रोजी वार मंगळवार प्रह्रार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय येरमाळा तर्फे गावातील दिव्यांग व्यक्तीना ग्रामपंचायत तर्फे 5%. निधि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीस 500 रुपयाचे चेक वितरीत करण्यात आले यावेळी सरपंच, मंदाकीनी बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल, माजी सभापती विकास बारकुल यांच्या हस्ते सर्व दिव्यांगाचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रहार संघटना अध्यक्ष मारुती वाघमारे, उपाध्यक्ष किरण बारकुल व सर्व प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.