ताज्या घडामोडी
येरमाळा जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त भाषण, ओव्या एकांकिका संपन्न

तेरणा काठ वृत्तसेवा
येरमाळा येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा व केंद्रिय प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी सावित्रीच्या वेशभूषेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर सुंदर भाषणे केली.भाषणामध्ये सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी केलेले विशेष कार्य त्यासाठी घेतलेले अफाट कष्ट यांचा विशेष उल्लेख होता. यासोबतच ओव्या, एकांकिकाचे सादरीकरण केले,या कार्यक्रमाप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक अनिल बारकुल , सहशिक्षिका जाधव मॅडम, वाघमारे मॅडम, चेचे मॅडम, दिडवळ मॅडम, उकिरडे मॅडम, देशमुख मॅडम, शेरखाने सर तसेच शिंदे मॅडम व आगलावे सर यांच्यासह पालक,विद्यार्थी उपस्थित होते.