ताज्या घडामोडी

खामसवाडी येथे जगदंबा युवक पुरुष बचत गटाच्या वतीने दिवाळी निमित्त सभासदांना किराणा साहित्याचे वाटप

कळंब (प्रतिनिधी) कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि.९नोव्हेंबर रोजी येथील हनुमान मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जगदंबा युवक पुरुष बचत गटाच्या माध्यमातून सभासदांना दिवाळी निमित्त किराणा साहित्याचे व बोनस वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गावचे सरपंच श्री अमोल पाटील व दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सभासदांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी युवकांनी छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभारणीसाठी काळाची गरज आहे.उद्योग उभारणी करत असताना काही मदत लागली तर शक्य तेवढी मदत सिद्धिविनायक परिवाराच्या वतीने करेण असे या वेळी सांगितले,तर ग्रापंचायत सदस्य दयानंद पाटील यांनी गावातील उत्कृष्ट बचत गटांना ग्रामपंचतच्या माध्यमातून बक्षीस ठेवावे असे मत व्यक्त केले.तर गावचे सरपंच श्री.अमोल पाटील यांनी ग्रामपंचायत च्या व उमेद अभियान च्या माध्यमातून बचत गट सक्षमिकरण करण्यास मदत करु असे मत व्यक्त केले. या वेळी बचत गटाचे अध्यक्ष महेश शेळके यांनी बचत गटाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच बचत गटाची २१लाख रुपये सद्यस्थितीत बचत जमाअसुन गटातील सदस्यांना अडीअडचणी सोडविण्यासाठी गटाच्या माध्यमातून आम्ही मदत करत आहोत. तर गावातील सावकार शाहीला बचत गटाच्या माध्यमातून आळा बसत आहे.सदरील गट व्यवस्थित चालत असुन गटातील सर्व सदस्य वेळेवर बचत, व कर्ज भरणा करत आहेत.असे बचत गटाचे अध्यक्ष महेश शेळके यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शरद बापू शेळके,ग्रा.पं.सदस्य विश्वास कोकणे,ग्रा.पं.सदस्य दयानंद पाटील, शंकर तांदळे, उपसरपंच किरण पाटील, पत्रकार सुनील पाटील, पत्रकार हनुमंत पाटुळे, पत्रकार गोपाळ शेळके, राजेंद्र गरड, मराठा आरक्षण उपोषणकर्ते रमेश साहेबराव शेळके, प्रशांत सुरवसे, दत्तात्रय शेळके,अक्षय शेळके, बलराम कुलकर्णी, सादिक सय्यद, महादेव शेळके, संजय शेळके,सावता माळी, सतिश माने,गोपाल राठोड, शेषेराव शेळके,पाशुमीयाॅ मणियार, यांच्या सह बचत गटाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुंदर माळी यांनी केले तर आभार शरद बापु शेळके यांनी मानले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.