ताज्या घडामोडी

प्रा. सोमनाथ लांडगे यांचा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सन्मान

तेरणा काठ वृत्तसेवा — सामाजिक न्यायाचे प्रणेते, बहुजन समाजासाठी आयुष्य वेचणारे आणि शिक्षणातून परिवर्तन घडविणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने समाजकार्य व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. सोमनाथ लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.

धाराशिवमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, मा. नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रा. सोमनाथ लांडगे सरांचा गौरव करण्यात आला. या वेळेस प्रा. रवी सुरवसे सर, नागटीळक सर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रा. लांडगे सर गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अविरत कार्य करत आहेत.

गेल्या महिन्यात अमरावती येथे त्यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार मिळाला असून, आतापर्यंत विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

श्री साई श्रद्धा एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी NEET परीक्षेसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीज सुरू केली असून, यामार्फत अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएससारख्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून दिला आहे. पहिल्या वर्षी 3 विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी 74, तिसऱ्या वर्षी 92, चौथ्या वर्षी 119 विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यात यश मिळाले आहे. चालू शैक्षणिक वर्षात ही संख्या 130 ते 140 विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

त्यांच्या श्री साई श्रध्दा एज्युकेशन संस्थेमार्फत कमी फीस मध्ये मुलींसाठी वसतीगृह, अत्यल्प दरात प्रवेश मार्गदर्शन सर या विद्यार्थ्यांना सुविधा देत आहेत.
व्याख्यानमाला, प्रवचन, सेमिनार आणि वर्तमानपत्रांत लेखन या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्यही ते करत आहेत.प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या यशाबद्दल शहर व परिसरातून त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.