कळंब तालुका सकल मराठा समाजाची शुक्रवारी तालुकास्तरीय बैठक

कळंब/(जयनारायण दरक)
कळंब तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत होणाऱ्या पुढील आंदोलनाला आणि त्यांच्या रणनीतीला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधव एकत्रित येऊन पुढील नियोजन आखण्यासाठी बैठक घेणार असल्याच जाहिर करण्यात आले आहे आहे. ही बैठक शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी ढोकी रोडवरील रायगड मंगल कार्यालयात पार पडणार आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे पार पडलेल्या सभेमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथिल आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली असून यासाठी 20 जानेवारी 2024 रोजी आंतरवाली सराटी येथुन मुंबई पर्यंत पायी जाऊन आमरण ऊपोषन करण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी ते मुंबई या प्रवासात महाराष्ट्रातील विवीध भागातुन दहा लाख गाड्या व तिन कोटी मराठा समाज सहभागी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी घोषीत केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कळंब तालुक्यातून देखील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईला जाणार असून या आंदोलनाचे पुढील नियोजन करण्यासाठी रायगड मंगल कार्यालयात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील समन्वयकांकडुन सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र यावे व या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.